मुंबई : भारताचा वन-डे आणि टी-२० क्रिकेटमधील मुख्य यष्टिरक्षक रिषभ पंत ऑस्ट्रेलियाविरूध्दच्या मालिकेतील दुस-या वन-डे क्रिकेट सामन्याला मुकणार आहे. मंगळवारी झालेल्या सामन्यात पंतच्या हेल्मेटला चेंडू लागून दुखापत झाली होती. त्यानंतर त्याने यष्टीरक्षण देखील केले नव्हते. त्याला मंगळवारी रात्रीच रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.
Update: Rishabh Pant has got a concussion after being hit on his helmet while batting. KL Rahul is keeping wickets in his absence. Pant is under observation at the moment. #TeamIndia #INDvAUS pic.twitter.com/JkVElMacQc
— BCCI (@BCCI) January 14, 2020
दरम्यान, डोक्यावर चेंडू आदळल्यानंतर नियमानुसार खेळाडूला साधारण २४ तास निरीक्षणाखाली ठेवण्यात येते. रिषभ पंत सध्या बरा असून त्याचे वैदयकीय अहवालदेखील चिंता न करण्यासारखे आहेत. त्यामुळे त्याला रूग्णालयातून सोडण्यात आलं असून नियमानुसार बेंगळुरूतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पुनर्वसनाच्या कार्यक्रमाला जावं लागणार आहे.
राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतील चाचणीनंतरच तिस-या वन-डे सामन्यातील रिषभ पंतचा सहभाग निश्चित होणार आहे. तसेच तिस-या सामन्यासाठी त्याची निवड केली जाणार आहे की नाही याचा खुलासा अद्याप बीसीसीआयकडून करण्यात आलेला नाही.