नवी दिल्ली : मध्यप्रदेशमध्ये आता विधानसभा निवडणुकीचे सर्वांना वेध लागले आहेत. त्यादृष्टीने सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. यामध्ये भाजपसुद्धा मागे नसून पक्षाने आपली संपूर्ण ताकद या निवडणुकीमध्ये लावण्याच्या दृष्टीने पावले टाकली असल्याचे पाहायला मिळत आहे.
नुकतीच भाजपने आपली पहिली उमेदवारांची यादी देखील जाहीर केली. आता यातच अजून एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीला दोन महिने बाकी असतानाच शिवराज सिंग चौहान यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार केला आहे. या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये तीन मंत्र्यांना संधी मिळाली आहे.
गौरीशंकर बिसेन, राजेंद्र शुक्ला आणि राहुल लोधी असे या तीन नवीन मंत्र्यांची नावे आहेत. राज्यपाल मंगु भाई पटेल यांनी या मंत्र्यांना शपथ दिली. गौरीशंकर बिसेन हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ सदस्य आहेत. यंदा सातव्यांदा ते निवडून आले आहेत. 1985,1990,1993, 2003 मध्ये ते आमदार म्हणून निवडून आले होते.
याचबरोबर ते विधानसभेच्या कित्येक समित्यांमध्ये सदस्य देखील होते. 1998 आणि 2004 मध्ये ते खासदार म्हणुन निवडुन आले. त्यांना तीन वेळा मध्य प्रदेश बीजेपी चे उपाध्यक्ष बनवण्यात आले आहे
राजेश शुक्ल रीवा या विधानसभेच्या क्षेत्रातुनआमदार म्हणुन निवडुन आले आहेत. ते भारतीय जनता पक्षाचा मोठा चेहरा आहेत. 2003 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले होते. त्यानंतर आजपर्यंत ते नेहमीच जिंकून येत आहेत. 2018 मध्ये रिवा जिल्ह्यामध्ये आठही जागा बीजेपीला मिळाला होत्या. यामुळे त्यांचं भारतीय जनता पक्षामध्ये चांगलचं वजन आहे.