मुंबई – सुप्रसिध्द दक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडाचा मोठा चाहता वर्ग आहे. त्याच्या हटके स्टाइल आणि लुकसाठी तो अधिक ओळखला जातो. मात्र मागील काही दिवसांपासून त्याच्या लग्नाबाबत विशेष चर्चा सुरू असल्याचे दिसते. नुकतेच त्याने एका शोदरम्यान त्याच्या लग्नाबाबत मोठा खुलासा केला आहे. विजयच्या आईला नातवंडे हवे आहेत. त्यामुळे त्याने लवकर लग्न करावे अशी तिची इच्छा असल्याचे विजयने सांगितले आहे.
विजयनं काही दिवसांपूर्वी त्याच्या लग्नाविषयी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी तो म्हणाला की, “घरातली लोकं मला लग्नासाठी दबाव आणत आहे. त्यांचे म्हणणे आहे की, मी लवकर लग्न करुन मोकळं व्हावं. त्यामुळे ते वेगवेगळ्या प्रकारे ती गोष्ट माझ्या मनावर दबाव आणताना दिसत आहे. त्यांना नातू हवा आहे. मला आता लवकरात लवकर लग्न कर असे सांगण्यात आले आहे.”
विजयकडून हे ऐकून ज्येष्ठ अभिनेत्री राधा विजय यांनी अभिनेत्याला त्याच्या आई-वडिलांना हवा तो आनंद देण्याचा सल्ला दिला. यावर विजय म्हणाला- ‘पण मला सध्या लग्न करण्यात रस नाही. मी अनेकदा माझ्या आई-वडिलांना गमंतीत सांगतो की त्यांनी एकमेकांशी पुन्हा लग्न करावे.” विजयचे हे बोलणे ऐकून शोमधील प्रेक्षकही हसू लागतात.
दरम्यान, विजयचा ‘खुशी’ चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होणार आहे. त्याच्या प्रमोशनच्या निमित्तानं तो एका शो मध्ये गेला होता. त्यावेळी त्यान वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तर दिली. तसेच विजयनं लग्नाबाबत केलेले भाष्य विशेष चर्चेत आले. दरम्यान, विजयचे रश्मिका मंदानासोबत नाव जोडले जाते. त्यांच्या रिलेशनशिपमध्ये नेहमी चर्चा रंगलेली असते. मात्र अद्याप या दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल काहीही सांगितलेले नाही.