मुंबई – दिग्दर्शक करण जोहरचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट विशेष गाजला. या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणविरसिंह मुख्य भूमिकेत होते. याशिवाय अभिनेता धर्मेंद्र, जया बच्चन, शबाना आझमी हे दिग्गज कलाकार देखील या चित्रपटात आहेत. या चित्रपटातील धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्या किसिंग सीनची चांगलीच चर्चा झाली. धर्मेंद्र यांच्यानंतर आता पत्नी अभिनेत्री हेमा मालनी या देखील सिनेमात लिप लॉक करणार आहेत.
एका मुलाखतीदरम्यान हेमा मालिनी यांना धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्यासारखे ऑनस्क्रीन लिप लॉक सीन करणे तुम्हाला सोयीचे होईल का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर सकारात्मक उत्तर देत त्या म्हणाल्या, “‘का नाही, नक्की होईल. जर ते चांगले असेल आणि चित्रपटाशी संबंधित असेल तर कदाचित मी ते करू शकेन.” यावेळी त्यांनी करण जोहरचा रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपट अद्याप पाहिला नसल्याचेही सांगितले.
काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीदरम्यान हेमा मालिनी यांनी सांगितले होते की, “मला खात्री आहे की लोकांना हा चित्रपट आवडला आहे. मी धरमजींसाठी खूप आनंदी आहे, कारण त्यांना पूर्णवेळ कॅमेरासमोर राहणे आवडते. त्यांना ते छान वाटते.” दरम्यान, वयाच्या 87 व्या वर्षी धर्मेंद्र यांनी लिप लॉकचा सीन केल्याने अनेकांनी त्यांच्यावर टीका केली होती. तर काहींनी त्यांचे कौतुकही केले होते.
दरम्यान, हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांनी 1980 मध्ये लग्न केले आहे. दोघांच्या वयात 13 वर्षांचा फरक आहे. ते दोघे विभक्त राहत असून त्यांना ईशा देओल आणि आहाना देओल या दोन मुली आहेत.