बुलंदशहर : नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) विरोधात बुलंदशहर जिल्ह्यात तीव्र निर्दशने चालू आहे. बुलंदशहरमधील कोतवाली नगर कोर्ट परिसरातील नमाजच्या प्रार्थना नंतर निदर्शकांनी जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला असता जमावाने पोलिसांवर दगडफेक तसेच गोळीबारही केला.
येथे पोलिसांच्या वाहनांना आग लावण्यात आली. मेरठमधील कोतवाली भागात तोडफोड करणाऱ्या जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. शहराच्या इतर भागातही आंदेलनाने उग्र रूप धारण केले आहे.
बुलंदशहरमध्ये पोलिसांनी गोळीबार केला
बुलंदशहरच्या कोर्ट परिसरात दहा हजारांच्या जमावाने जोरदार घोषणाबाजी निदर्शने करण्यास सुरवात केली आहे. पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला असता जमावाने पोलिसांवर दगडफेक तसेच गोळीबारही केला.
त्यानंतर परिस्थिती बिकट झाली आणि पोलिसांनाही गोळीबार करावा लागला. अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नाही. संतप्त जमावाने पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक केली आणि काही वाहनांना आग लावली. येथील परिस्थिती नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जात होता.