बाईटडान्स लवकरच 400 अब्जचा पल्ला गाठणार

वॉशिंग्टन – ब्लूमबर्गच्या बिलीनेअर इंडेक्‍स नुसार टिक टॉकचे स्वामित्व असलेल्या बाईटडान्सचे बाजारमूल्य 250 अब्ज डॉलर्सवर गेले आहे. 38 वर्षीय झांग यीमिंग या कंपनीत चौथे भागीदार आहेत. विशेष म्हणजे गेल्या वर्षी खुद्द चीन सोबत भारत, अमेरिकेसह अन्य काही देशांनी टिकटॉकवर बंदी घातली होती. तरीही या अडचणींचा सामना करून बाईटडान्सने ही प्रगती केली आहे.

यामिंग धनकुबेर यादीत सामील झालेच आहेत पण त्यांनी यामुळे टेन्सेट होल्डिंगचे पोनो मा, नोग्फूचे मालक जोंग शैनशेन व अमेरिकेच्या वॉलटन परिवाराशी बरोबरी केली आहे. यामिंग हे दीर्घ काळाची धोरणे आखण्यासाठी विशेष ओळखले जातात. छोट्या लहान अडचणींना ते कधीच घाबरत नाहीत असे त्यांना जवळून ओळखणारे सहकारी सांगतात. काही तज्ञांच्या मते बाईटडान्स लवकरच 400 अब्ज डॉलर्सचा टप्पा गाठण्याची शक्‍यता आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.