अखेर Tik Tok ने भारतातील गाशा गुंडाळला; ई-मेलद्वारे दिली महत्त्वपूर्ण माहिती

नवी दिल्ली : कमी वेळेत भारतीय बाजारात आपला दबदबा निर्माण करणाऱ्या टीकटॉकला आपला गाशा अखेर गुंडाळावा लागला आहे. टिकटॉकची (Tiktok) पॅरेंट कंपनी असलेल्या बाईटडान्सने भारतात आपला व्यवसाय बंद करण्याची घोषणा केली आहे.

कंपनीने भारतात आपला व्यवसाय जवळपास बंद केला आहे. भारतात टिकटॉक आणि हॅलो अ‍ॅपचे स्वामित्व असलेल्या या कंपनीच्या सेवांवर केंद्र सरकारकडून बंदी घालण्यात आलेली आहे. टिकटॉकचे प्रमुख वेनेसा पाप्पस आणि ग्लोबल बिझनेस सोल्यूशन्सचे उपाध्यक्ष ब्लेक चांडली यांनी कर्मचाऱ्यांना ई-मेल करून याबाबत माहिती दिली आहे

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाईटडान्सने आपल्या 1000 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. कंपनीने काढलेल्या कर्मचाऱ्यांना 5 महिन्यांचा पगार देण्याचं सांगितंल असल्याची माहिती आहे. कंपनीच्या संपूर्ण सेल्स टीमला कंपनी सोडण्याबाबत सांगण्यात आलं आहे. परंतु, काही आंतरराष्ट्रीय कामात मदत करणाऱ्या टीमसहित महत्वाच्या प्रकल्पांवर काम करणारे कर्मचारी अद्यापही कार्यरत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.