कोल्हापूर | जिल्ह्यात दिवसभरात 452 करोनाबाधित, 12 जणांचा करोनाने मृत्यू

कोल्हापूर –  जिल्ह्यात करोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. शुक्रवारी दिवसभरात ४५२ जणांना करोनाची लागन झाली आहे. तर कोल्हापूर शहरात १९२ रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात १२ जणांचा मृत्यू झाला आहे.

करोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी प्रशासन प्रयत्न करत असताना नागरिकांकडून संचारबंदीचे सर्रास उल्लंघन होत आहे. जिल्हा आरोग्य विभागाने आज शुक्रवारी अहवाल जाहिर केला असून त्यामध्ये जिल्ह्यात ४५२ जणांना करोनाची लागन झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

सर्वाधीक कोल्हापूर शहरात १९२ रुग्ण असून त्या खालोखाल हातकणंगले तालुक्यात ५७ तर करवीर तालुक्यात ५० करोनाबाधित आढळले आहेत. आजरा आणि भुदरगड तालुक्यात प्रत्येकी १७, चंदगडमध्ये पाच, गडहिंग्लजमध्ये चार, गगनबावड्यात एक, कागलमध्ये १६, पन्हाळ्यात २० राधानगरीत ३, शाहूवाडीत चार, शिरोळमध्ये बारा तर नगरपालिका हद्दीत २३ रुग्ण सापडले आहेत. सध्या जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या तीन हजाराच्या पार असून ३१५० रुग्णांवर उपचार केले जात आहेत. आज २१९ रुग्णांना डिसचार्ज मिळाला आहे.

आज करोनाने १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये करवीर तालुक्यातील निगवेतील ७५ वर्षाची महिला, शुक्रवार पेठेतील ७० वर्षाचा पुरुष, भुदरगड तालुक्यातील कडगावमधील ७५ वर्षाचा पुरुष, शाहूवाडी तालुक्यातील पंडुरे येथील ५० वर्षाची महिला, कोल्हापूर शहरातील यादवनगरातील ५० वर्षाची महिला, कागल तालुक्यातील कसबा सांगाव येथील ५० वर्षाचा पुरुष, आजरा तालुक्यातील महागोंड येथील ५९ वर्षाचा पुरुष, गडहिंग्लज तालुक्यातील मनवाडमधील ६५ वर्षीय पुरुष, हलकर्णी येथील ६१ वर्षाचा पुरुष, सांगलीतील ५७ वर्षीय महिला, कणवकवलीतील ८१ वर्षीय पुरुष, कर्नाटकातील हुक्केरी तालुक्यातील अंकली येथील ६८ वर्षीय महिलेचा समावेश आहे. सीपीआर हॉस्पिटलमध्ये सहा, एसडीएम गडहिंग्लज येथे तीन, आणि खासगी हॉस्पिटलमध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.