उस्मानाबाद: सध्या राज्यात निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. त्यामुळे आपापल्या पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसलीय. प्रचारासाठी दिवसरात्र एक करणाऱ्या या राजकीय मंडळींकडून वाहतूक नियम मात्र पायदळी तुडवले जात असल्याची परिस्थिती आहे.
उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हारला होतोय. या व्हिडिओत ओमराजे हे बुलेट वर बसून ट्रिपल सीट जात आहेत. तसेच या तिघांपैकी एकानेही हेल्मेट घातलेले नाही. त्यामुळे वाहतूक नियमांची “ऐसी की तैशी” करत या राजकीय मंडळींकडून प्रचार सुरु असल्याचं पहायला मिळतंय.
तसेच सामान्य नागरिकांना जे नियम लागू होतात ते नियम या राजकीय मंडळीसाठी नाहीत का ? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित करण्यात येतोय.