पुजाराचे अर्धशतक, कोहली शतकाच्या वाटेवर
पुणे : भारताचा सलामीवीर मयंक अग्रवाल याने सलग दुसऱ्या कसोटीत शतक झळाकावत आपल्या भन्नाट फॉर्मची चुणूक पुन्हा दाखविली. भारताच्या धावसंख्येला रोखण्याचे कगिसो रबाडा याचे प्रयत्न अपुरे ठरले.
अग्रवालने तब्बल 16 चौकार आणि दोन उत्तुंग षटकारांच्या सहाय्याने 195 चेंडूत 108 धावांची खेळी केली. आज खेळाची सुरवात झाली तेंव्हा रोहीत शर्माने चौकार मारत आपले इरादे स्पष्ट केले. मात्र, रबाडावर हल्ला चढवायच्या नादात 14 धावांवर असताना क्विंटन डे क्वॉकच्या हातात झेरल देउन तो तंबूत परतला. मात्र, त्यानंतर आलेल्या पुजारानेही आपला आर्क्रमक रोख कायम ठेवला. त्याने एक षटकार आणि नऊ चौकाराच्या सहाय्याने 112 चेंडूत 58 धावा फटकावल्या.
पुजारा बाद झाल्यानंतर मयंकही लवकर बद झाला. त्याने 195 चेंडूत 108 धावा फटकावल्या. प्लेसीसकडे त्याने झेल सोपवला. त्यानंतर आलेल्या अजिंक्य राहणे संयमी खेळी करत आणखी पडझड होऊ दिली नाही. खेळ थांबला त्यावेळी विराट कोहली 63 धवांवर तर अजिंक्य राहणे 1 धावांवर खेळत होता. द. अफ्रिकेच्या रबाडाने 48 धावांच्या बदल्यात तीन बळी पटकावले.