“…मात्र गर्दी जमवणाऱ्या एका “गबरुवर” कारवाई नाहीच”

आशिष शेलारांची शिवसेनेवर खोचक टीका

मुंबई – पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचे नाव आल्याने राज्यातील राजकारणात एकच गोंधळ निर्माण झाला होता. दरम्यान आरोपांवर संजय राठोड हे चक्क १५ दिवसांनी सर्वांसमोर आले असून पोहरादेवीला दाखल झाले आहेत.  यावेळी त्यांच्या समर्थकांनी पोहरादेवी परिसरात जोरदार शक्ती प्रदर्शन केले. या शक्तीप्रदर्शनावरून  भाजप नेत्यांनी   मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली आहे.  यातच भाजप नेते आशिष शेलार ट्विट करत शिवसेनेला टोला लगावला आहे.

आशिष शेलार म्हणाले,’कोरोना काळात गर्दी केली म्हणून 10 हजार जणांवर गुन्हे दाखल करु पण गर्दी जमवणाऱ्या एका “गबरुवर” कारवाई नाही , एका भगिनीचा जीव गेला, महाराष्ट्र हळहळला पण मा.मुख्यमंत्री बोलणार नाहीत.’ महाविकास आघाडी सरकारचे महाराष्ट्रात सुरु आहे. तो मी नव्हेच,‼️ असं ट्विट  करत शिवसेनेला त्यांनी टोला लगावला आहे.

तत्पूर्वी,  या शक्तीप्रदर्शनावरून  भाजप नेत्यांनी  मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली आहे. यावर आता‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नियम तोडल्यास आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडत नाहीत. यासाठी संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले  आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.