Vasant More Post| वसंत मोरे यांनी मनसेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेत सर्वांना धक्का दिला. दोन दिवसांपूर्वी त्यांनी मनसेला जय महाराष्ट्र केल्याने आता ते कोणत्या पक्षात जाणार याबाबतची चर्चा रंगली आहे. मात्र अद्याप याबाबत त्यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. मनसेतून निरोप घेताना वसंत मोरे भावुक झाल्याचे देखील पाहायला मिळाले होते. यातच आता वसंत मोरे यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
‘मला ग्रुप मधून काढून टाकताल पण पोरांच्या हृदयातून कसे काढणार…? ‘असा प्रश्न मनसे नेत्यांना केलाय. वसंत मोरे यांची ही भावनिक फेसबुक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यापूर्वी ‘साहेब मला माफ करा’ असं म्हणत वसंत मोरे यांनी मनसे पक्षाचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांना नमस्कार करत फेसबुक पोस्ट शेअर केली होती.
View this post on Instagram
तर पत्रकार परिषदेत वसंत मोरे म्हणाले, ’मी पक्षाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. मी सध्या कोणत्याही पक्षात जाणार नाही. तसेच पुढील दोन ते तीन दिवसात माझी भूमिका स्पष्ट करणार आहे. ‘ असं म्हणत ते येत्या दोन ते तीन दिवसात आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले. Vasant More Post|
अविनाश जाधवांची मोरेंवर टीका
त्यानंतर ठाण्याचे मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधवांनी नाव घेता फेसबूक राज ठाकरेंच्या बुटाचा फोटो पोस्ट केला होता. या पोस्टमध्ये अविनाश जाधव यांनी लिहिले होते की, ’एक राजा रोज हत्तीवरून राज्यात फेरफटका मारायचा तेव्हा प्रत्येक चौकात राजाचं औक्षण केलं जायचं,आरती ओवाळली जायची,धुमधड्याक्यात स्वागत केलं जायचं. तेव्हा त्या हत्तीला वाटायचं औक्षण-आरती, आपलीच केली जात आहे.त्याला कळत नव्हतं ही राजाची पुण्याई आहे. राजामुळे त्याला हा मान मिळत आहे……’ Vasant More Post|
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ नेते शरद पवार यांची वसंत मोरे यांनी भेट घेतली होती. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर होत असलेल्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
हेही वाचा:
केंद्र सरकारची मोठी कारवाई; तब्बल 18 ओटीटी प्लॅटफॉर्मवर घातली बंदी