नवी दिल्ली : देशावरील करोना संकटाचा सामना करण्यासाठी सरकारतर्फे विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. अशातच समाजातून सर्व स्तरातून करोनाच्या नियंत्रणासाठी मदतीचे हात पुढे येत आहेत. भारतातील नामांकित उद्योगपती गौतम अडानी देखील समोर आले आहेत.
करोना नियंत्रणासाठी उद्योगपती गौतम अडानींकडून १०० कोटींची मदत जाहीर केली आहे. देशात अनेक उद्योगपती, कलाकार आणि नामवंत व्यक्तींकडून करोनाच्या नियंत्रणासाठी कोट्यवधींची मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यात अडानी यांनी देखील खारीचा वाटा उचलला असल्याचे सांगण्यात येत आहे.