शिरूर -शिरूर शहरातील पाषाण मळा जवळील राम पंचमी बिल्डींगमधील फ्लॅटचा दरवाजा तोडून घरातील सोन्या-चांदीचे दागिने, बॅंक पासबूक असा एकूण 37 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे.
याबाबत अज्ञात चोरट्यांविरोधात शिरूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रामचंद्र दीपक परब (रा. राम पंचमी, पाषाणमळा) यांनी फिर्याद दिली आहे.