पाचगणी : पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील ओळख असलेल्सा महाबळेश्वर तालुक्यातील वाढत्या अनाधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाअधिकारी जितेंद्र दुडी यांनी दिले आहेत . जिल्हाअधिकारी सातारा यांच्या आदेशान्वये महसुल विभागा ,पोलीस प्रशासन , ग्रामविकास विभाग , नगरपालीका विभाग यांच्या प्रमुख उपस्थितीत मेट गुताड येथीस संबाला हॅाटेल पहाटे बुलडोजरच्या सहाय्याने जमिनदोस्त करण्यात आले आहे .
तर गुरेघर येथील कड्याच्या कडेवर नव्याने सुरु असलेले अंदाजे ५हजार स्वेअर फुटचे बांधकाम देखील पाडण्याचे काम सुरु आहे . याकारवाईबात महाबळेश्वर तालुक्यात प्रशासनाकडुन प्रचंड गुप्तता पाळण्यात आली होती . पहाटेच जेसीबी पोखलेन , ट्रॅक्टरच्या माध्यमातुन प्रशासनाकडुन पोलीसांच्या फौजफाट्यासह कारवाई केली गेली आहे .
दरम्यान महाबळेश्वर तालुक्यातील अनाधीकृत कारवाईमुळे अनाधिकृत बांधकाम करणा -याचे धाबेदणादणाले आहेत . याकारवाईमध्ये वाई प्रांत राजेश जाधव , महाबळेश्वर तहसिलदार तेजस्वीनी पाटील , वाई तहसिलदार सोनाली मेटकरी , खंडाळा तहसिलदार अजित पाटील , पाचगणीमंडल अधिकारी चद्रकांत पारवे , महाबळेश्वर मंडल अधिकारी खटावकर , याच्यासह सर्व तलाठी तसेच पोलीस प्रशासनाकडुन कारवाई करण्यात आली