Buldhana Bus Accident – समृद्धी महामार्गावर बुलढाण्यात प्रवासी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात २५ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार बसने पेट घेतल्याने या प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळील समृद्धी महामार्गावरुन ही बस नागपूरहून पुण्याच्या दिशेने चालली होती. यादरम्यान मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. विदर्भ ट्रॅव्हल्सची MH 29 BE – 1819 क्रमांकाची ही बस नागपूरहून पुण्याकडे जात होती.
मिळलेल्या माहितीनुसार, बस पेटली असताना अपघाता स्थळी सुमारे अर्धा ते पाऊण तास कोणतीच मदत मिळू न शकली नाही हा अपघात रात्री दिडच्या सुमारास झाला त्यावेळी तेथे माहिती समोर येत आहे. या अपघात बसचा एक चालक कसा तरी काच फोडून बाहेर पडल्यावर त्याने फोन करून माहिती देईपर्यंत व मदत घटनास्थळी पोहोचेपर्यंत मोठी जीवितहानी घडून गेली. सदर मार्गावरून व घटनास्थळावरून कोणती वाहने गेलीत, त्यांनी ही घटना बघून मदतीसाठी काही प्रयत्न केले नाहीत का? असे प्रश्न आता उपस्थित होत आहे.
दरम्यान, या बस मधून प्रवास करणाऱ्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी जिल्हा नियंत्रण कक्ष (०७१२-२५६२६६८) अथवा अंकुश गावंडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी (८८६००१८८१७) यांच्यांशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.