Buldhana Bus Accident : विदर्भ ट्रॅव्हल्सच्या नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या बसला भीषण अपघात झाला. या अपघातात २५ जणांचा मृत्यू झाला. या अपघातात नागपूर, वर्धा, यवतमाळचे प्रवासी होते. यातील २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांमध्ये वर्ध्याच्या रहिवासी प्रणिता पौनिकर यांची कन्या अवंतिकादेखील प्रवास करत होती. नोकरीच्या निमित्ताने अवंतिका पुण्याला चालली होती. मात्र आता तिचा काही संपर्क होत नसल्याने कुटुंबीय काळजीत आहेत. तर आई प्रणिता पौनिकरने मला तिथे घेऊन चला असे म्हणत हंबरडा फोडला आहे.
विदर्भ ट्रॅव्हल्सच्या पुणे नागपूर बसला अपघात झाल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर वर्धा या ठिकाणी राहणाऱ्या प्रणिता पौनिकर यांच्या पायाखालची जमीनच सरकली. या अपघातात आपली लाडकी मुलगी अवंतिका सापडली हे समजताच त्यांच्यावर दुःखाचा डोंगरच या माय माऊलीवर कोसळला आहे. बस अपघातात आपली लाडकी मुलगी सापडल्याचे कळताच प्रणिता पौनिकर कोसळून पडल्या.
अद्याप त्यांना खरे काय ते सांगण्यात आले नाही. म्हणून मला मुलीला पाहायचे असल्याची आर्त हाक त्या देत आहेत.याविषयीची माहिती एका संकेतस्थळाने दिली आहे.
प्रणिता यांची कन्या अवंतिका हे पुण्यात नोकरीच्या निमित्ताने चालली होती. तिने एक मॉडेल म्हणून बऱ्यापैकी नाव कमविले होते. तिची बहीण मोनु ही पण पुण्यात नोकरी करते. ती तिथून निघाली आहे. पतीच्या आकस्मिक मृत्यू नंतर आपल्या मुलींचा सांभाळ श्रीमती पौनिकर यांनीच केला. त्यासाठी त्या काही काळ न्यू आर्ट्स कॉलेज मध्ये नोकरी करत होत्या. सध्या त्या मेघे विद्यापीठात कार्यरत आहेत.