मुंबई – अभिनेत्री नेहा धुपिया आज इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. ती सोशल मीडियावर सक्रिय असते. अनेक फोटो आणि व्हिडिओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच नेहाने तिचे काही फोटो इनस्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिचे हे फोटो चाहत्यांच्याही चांगलेच पसंतीस पडले आहेत.
नेहा धुपियाने इंडो-वेस्टर्न लुकमध्ये फोटोशूट केले आहे. या फोटोमध्ये तिने रंगीबेरंगी साडी घातली आहे. तसेच तिने हाय पोनीटेल वेणी घातलेली असून गळ्यात सुंदर चोकर घातला आहे. सध्या तिचा हा लुक चाहत्यांच्याही चांगलाच पसंतीस पडत आहे. याशिवाय तिने आणखी काही फोटो शेअर केले आहेत. दुसऱ्या फोटोंमध्ये ती वेगळ्या लुकमध्ये दिसत आहे. यातही तिने रंगीबेरंगी लॉन्ग कुर्ता परिधान केला आहे. याशिवाय स्टाईलिश निळ्या रंगाची पॅन्ट परिधान केली आहे. यात तिने एकापेक्षा एक पोज देत साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
दरम्यान, नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांनी 10 मे 2018 रोजी दिल्लीतील गुरुद्वारामध्ये गुपचूप लग्न केले. या जोडप्याच्या लग्नाची बातमी चित्रपटसृष्टीत कोणालाच माहीत नव्हती. लग्नाच्या काही तासांनंतर दोघांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करून सर्वांना आश्चर्यचकित केले होते.