हिमाचलमध्ये इमारत कोसळली, 22 जवानांना वाचवले तर 2 मृत्यूमुखी

हिमाचल प्रदेश : हिमाचल प्रदेशमधील सोलन जिल्ह्यातील कुम्हारहट्टी-नाहन मार्गावरील एक तीन मजली इमारत मुसळधार पावसामुळे कोसळली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली लष्कराने 35 जवान अडकले होते. यातील 22 जवानांना वाचवण्यात आले आहे, तर 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती महसूल व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक आणि विशेष सचिव डीसी राणा यांनी दिली आहे.

घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि बचाव दल घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. जखमींना धर्मापूर येथील रूग्णलयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. पंचकूला येथून एनडीआरएफ टीमसुध्दा रवाना झाली आहे. तसेच मिळालेल्या माहितीनुसार या इमारतीमध्ये ढाबा होता, त्याठिकाणी जवळपास 35 जवान हे जेवण करण्यासाठी थांबले होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)