मुंबई- सध्याच्या सोशल मीडियावर #BottleCapChallenge चॅलेंजेसची क्रेझ जोरदार सुरु आहे. हॉलिवूड स्टार इरोलसन ह्युज याने या चॅलेंजची सुरुवात केली असून, त्यापाठोपाठ अनेक बॉलिवूड कलाकारांनी हे चॅलेंज पूर्ण केले आहे. या सर्वांनी चॅलेंजचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Don’t thakao paani bachao pic.twitter.com/PjfdGxdTJg
— Salman Khan (@BeingSalmanKhan) July 14, 2019
दरम्यान, बॉलिवूड मध्ये सतत आपल्या फिटनेस बद्दल चर्चेत असणार अभिनेता ‘सलमान खान’ने देखील हे चॅलेंज पूर्ण केले आहे. मात्र, सलमाने आपल्या व्हिडीओ मधून समाजाला एक मोलाचा संदेश दिला आहे. “पाणी वाचवा” असं त्याने आपल्या व्हिडीओ मध्ये म्हंटल आहे.