बांधकाम व्यावसायिकाची आठ लाखांची फसवणूक 

सातारा – कर्ज देण्याच्या आमिषाने बांधकाम व्यावसायिकाची 7 लाख 94 हजार 850 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चार फायनांस कंपन्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.राजेंद्र रामचंद्र होटकर ( रा. सैदापूर, ता. सातारा) हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांना व्यवसाय वाढीसाठी 20 लाखांचे कर्ज पाहिजे होते. यासाठी त्यांनी वेगवेगळ्या फायनांन्स कंपनीकडे कर्जाची मागणी केली.

संबंधित कंपन्यांनी होटकर यांना तुमचे कर्ज मंजूर झाले असून, आणखी काही रक्कम तुम्हाला भरावी लागेल, असे सांगितले. अशी वारंवार वेगवेगळी कारणे संबंधितांकडून सांगितली जात होती. त्यामुळे होटकर यांनी टप्प्या टप्प्याने संबंधितांच्या बॅंक खात्यावर तब्बल 7 लाख 94 हजार 850 रुपयांची रोकड भरली. त्यानंतर आपल्याला कर्ज मिळेल, या आशेवर होटकर होते. मात्र, संबंधित कंपन्यांकडून टाळाटाळ होत असल्याचे लक्षात आल्यानंतर होटकर यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. सध्या कार्यरत असणाऱ्या प्रसिद्ध फायनान्स कंपनीची नावे सांगून संबंधितांनी होटकर यांची फसवणूक केली असल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here