हडपसरमध्ये हज हाऊस उभारू- हाके

हडपसर – मुस्लिम समाज बांधवांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी व हज यात्रेकरूंसाठी हडपसर विधानसभा मतदारसंघात हज हाउस उभारू, असे आश्‍वासन वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार घनश्‍याम बापू हाके यांनी दिले.

घनश्‍याम बापू हाके यांनी मतदारसंघात प्रचाराचा झंझावात सुरू केला आहे. हाके यांनी आज मुंढवा भागात तर मंगळवारी सय्यदनगर भागातून पदयात्रा काढून गॅस-सिलिंडर चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन केले.

यावेळी वंचित बहुजन आघाडी पुणे शहर अध्यक्ष मुनुहर भाई कुरेशी, सफीयान शेख, पितांबर धिवार, गौस शेख, मौलाना अकबर पटेल, भारत मोरे, संतोष सोनवणे, चेतन शिरोळे उपस्थित होते.

ससाणेनगर-सय्यदनगरचा भुयारी मार्ग, की उड्डाणपूल? हा प्रश्‍न तसाच असून केवळ श्रेयवादाचे राजकारण सत्ताधारी व विरोधक करत आहेत. खोटी आश्‍वासने देवून मतांचे राजकारण सत्ताधारी आणि विरोधकांनी केले आहे. आपला विजय हा हडपसरमध्ये मुस्लिम समाज बांधवांसाठी हज हाउस उभारणी आणि समस्यामुक्त मतदार संघ करण्यासाठी असेल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.