Budget 2024 : नव्या संसदेत मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प आज सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी सादर केला जात आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आपल्या कार्यकाळातील सहावा अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी त्यांनी सकल विकासाकडे सरकारच लक्ष असून महिला सशक्तीकरणावर सरकारचा भर असल्याचे यावेळी म्हटले.
गेल्या 10 वर्षांत महिला उच्च शिक्षण घेत आहेत. उच्च शिक्षणात महिलांचा समावेश १० वर्षांत २८ टक्क्यांनी वाढला आहे. एसटीईएम अभ्यासक्रमांमध्ये मुली व महिलांचा सहभाग ४३ टक्के आहे अशी माहिती देखील केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यानो दिली.
पीएम आवास योजने अंतर्गत 70 टक्के घर ग्रामीण महिलांना प्रदान करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
मोदी सरकारच्या काळात १ कोटी महिला या लखपती दीदी बनल्या असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, लखपती दीदींना बढती दिली जाईल. पगार दोन कोटींवरून तीन कोटींपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 9 कोटी महिलांच्या आयुष्यात बदल झाला आहे. लखपती दीदींकडून स्वावलंबन आले आहे. अंगणवाडी कार्यक्रमांना गती दिली जाईल असेही त्यांनी यावेळी म्हटले.
दरम्यान, देशभरातील अंगणवाडीतील आशा सेविकांना आयुषमान योजना लागू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी येवेळी दिली. ९ ते १४ वयोगटातील मुलींच्या लसीकरणावर भर देणार असल्याचे त्यांनी म्हटले.