BSF jawan Amit Patil | जळगावचे सुपुत्र जवान अमित पाटील यांना वीरमरण

जळगाव – जम्मू काश्‍मीर येथे कर्तव्य बजावत असताना जळगावचे सुपुत्र आणि बीएसएफचे जवान अमित पाटील यांना वीरमरण आले आहे ( Amit Patil martyred ) . चाळीसगाव तालुक्‍यातील वाकडी येथील ते रहिवासी होते. त्यांच्या पश्‍चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि लहान भाऊ असा परिवार आहे.

शहीद अमित पाटील हे वाकडी येथील शेतकरी साहेबराव नथू पाटील यांचे ज्येष्ठ पुत्र होते. सन 2010 मध्ये ते सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) भरती झाले होते. सध्या जम्मू-काश्‍मीर येथे कर्तव्यावर असताना आठ दिवसांपूर्वी अचानक त्यांच्या अंगावर बर्फाची लादी कोसळली होती.

यात ते गंभीर जखमी झाले होते. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. परंतू आज (बुधवारी) सकाळी दहा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. जवान अमित पाटील यांच्या मृत्यूमुळे वाकडी गावावर शोककळा पसरली आहे. ( Amit Patil martyred )

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.