अहमदनगर – जिल्ह्याचे जेष्ठ नेते साहित्यिक माजी खासदार यशवंतराव गडाख – पाटील यांचे सुपूञ शिवसेनेचे नेते व राज्याचे कॅबिनेट मंञी शंकरराव गडाख यांच्या स्वियसहाय्यकावर गोळीबार झाल्यानंतर पुन्हा दोन दिवसात राज्याचे कॅबिनेट मंञी शंकरराव गडाख – पाटील व त्यांचे चिरंजिव उदयन गडाख – पाटील यांना जिवे ठार मारण्यासाठी इस्ञायली बनावटीचे २० पिस्टल घेवून आलो आहे.
आमच्या नादी लागण्याचीच आम्ही फक्त वाट पाहून आहोत आम्ही कोणाला घाबरत नाही घरात जावून ठोकून टाकु अशी अॅडिओ क्लिप सोशल मिडियातून प्रसारित झाल्यामुळे एका सुसंस्कृत कुटूंबातील मंञ्याच्या स्वियसहाय्यकांवर गोळीबार झाल्यानंतर आता तर पुन्हा मंञ्यासह त्यांच्या सुपूञाला संपवून टाकण्याची चाल गुन्हेगारी प्रवृती असणाऱ्यांकडून खेळली जात असल्याचे प्रसारित झालेल्या अॅडिओ क्लिमुळे स्पष्ट झाल्यामुळे तालुक्यात कायदा व सुव्यवस्था जिवंत आहे. की,नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ऐतिहासिकदृष्ट्या धार्मिक तालुक्याची ओळख वारंवार घडणाऱ्या विविध कारणांमुळे बदनामीची झालर तालुक्याला लागली आहे गृहखात्याने याकडे विशेष लक्ष घालून गुन्हेगारीचा नायनाट करणे गरजेचे आहे अन्यथा नेवाशाचा बिहार होण्याचा अधिक धोका नाकरता येत नसल्याचे तालुक्यात घडणाऱ्या घटनांवरुन ही बाब सप्रमाण सिद्ध होतांना दिसून येत आहे.
राज्याचे कॅबिनेट मंञी नामदार शंकरराव गडाख – पाटील यांचे स्वियसहाय्यक असलेले राहूल राजळे यांच्यावर गुन्हेगारी पार्श्वभुमी असलेल्या लोकांनी लोहगांव (ता.नेवासा) परिसरात गोळीबार करुन जखमी केल्याची घटना ताजी असतांनाच पुन्हा दोन दिवसातच मंञी शंकरराव गडाख व त्यांचे सुपूञ उदयन गडाख यांना गोळ्या घालण्यासाठी इस्ञायली बनावटीचे २० पिस्टल आणून घरात जावून गोळ्या घालू अशा संभाषणाची क्लिप प्रसारित झाल्यामुळे तालुक्याला मोठा धक्का बसला आहे.