लखनऊ – सध्या लग्नात नवा ट्रेंड सुरु झालाय तो म्हणजे नवरदेवाची आणि नवरीची एन्ट्री, आपण घोड्यावरून, हत्तीवरून, आलीशान कारमधून किंवा मग हेलिकॉप्टरमधून पाहिली असेल. नवरीच्या एन्ट्री चा नवरी कधी बुलेट चालव येते तर कधी डान्स करत लग्नमंडपात एंट्री घेते सध्या सोशलवरही अशाच नवरीच्या एंट्रीचे व्हिडियो व्हायरल होतांना दिसतात.
पण उत्तर प्रदेशच्या प्रतापगड इथं मात्र नवरीची एंट्री पाहून तुम्ही थक्क व्हाल. नवरीने लग्न मंडपात हवेत गोळीबार करत तिची हौस पूर्ण केली आहे. सध्या हा व्हिडियो सोशलवर व्हायरल होत आहे.
प्रतापगढ़ जिले के जेठवारा थाना क्षेत्र में रिवाल्वर रानी बनी एक दुल्हन ने शादी में की हर्ष फायरिंग। वीडियो वायरल होने पर @pratapgarhpol ने दुल्हन समेत तीन के खिलाफ दर्ज की एफआईआर। अब निरस्त होगा रिवाल्वर का लाइसेंस। @JagranNews @Uppolicehttps://t.co/dea1wA31SI pic.twitter.com/zgn28xYdnd
— amit singh (@Join_AmitSingh) June 1, 2021
हा व्हिडियो उत्तर प्रदेशच्या प्रतापगड येथे घडला आहे. नवरी बुलेट चालवत किंवा डान्स करत येत नसून तिने थेट हवेत गोळीबार करत लागण मंडपात एन्ट्री घेतली आहे. नवरीचा हा व्हिडियो सोमवारी सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. मिळलेल्या माहितीनुसार, प्रतापगड येथे जेठवारा ठाण्यापासून तीन किलोमीटर दूर असलेल्या एका गावात लग्नसमारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं.
यावेळी रात्री सुमारे अकरा नवरीने लग्नासाठी स्टेजवर चढत असतानाच तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीनं तिच्या हातात रिवॉल्वर दिली. नवरीने स्टेजवर चढताच हवेत गोळीबार केला. यानंतर तिने नवरदेवाच्या गळ्यात वरमाळा घातली. यादरम्यान, लोकांनी टाळ्या वाजवत आनंद व्यक्त केला.
दरम्यान, हा व्हिडियो काहीच क्षणात सोशलवर व्हायरल होताच एसओ जेठवारा संजय पांडे यांना याबाबत विचारणा करण्यात आली. मात्र, याबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचं त्यांनी म्हटलं. मात्र, हे खरंच झालं असल्यास याप्रकरणी लायसन्स जप्त करण्याची कारवाई केली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.