चिंचवड – संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या कसबा आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज होत आहे. यामुळे उमेदवाराची धाकधूक वाढली आहे. कसब्यामध्ये महाविकास आघाडी उमेदवार रवींद्र धंगेकर आणि महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्यात थेट लढत आहे.
तर दुसरीकडे, चिंचवड विधानसभा मतदार संघामध्ये महायुतीच्या अश्विनी जगताप आणि महाविकास आघाडीचे नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात तिरंगी लढत झाली होती. या निवडणुकीत भाजपा-काँग्रेस-राष्ट्रवादी यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
दरम्यान, अश्यातच अश्विनी जगताप पोस्टल मतांमध्ये आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे. तर आघाडीचे नाना काटे यांना पिछाडीवर टाकले आहे. अश्विनी जगताप यांना 400 मतं मिळाली असून दुसऱ्या फेरी पर्यंतर अश्विनी जगताप यांची आघाडी कायम आहे. पहिल्या फेरी अखेर अश्विनी जगताप यांना 4053 मत मिळाली आहे. नाना काटे यांना 3604 मत तर अपक्ष राहुल कलाटे यांना 1273 मत मिळाली आहे.
दरम्यान, अश्यातच अश्विनी जगताप यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, पोस्टल मतदानात आघाडीवर आहे, ही साहेबांनी केलेल्या कामाची पावती आहे. आम्ही ही निवडणूक विकासाच्या मुद्यावर आम्ही निवडणूक लढविली आहे. मेट्रो सिटी आणि स्मार्ट सिटीच्या च्या माध्यमातून विकास करणार असल्याचे सुद्धा अश्विनी जगताप यांनी म्हंटलं आहे.