पुणे – गेल्या महिन्याभरापासून प्रचंड चर्चेत राहिलेल्या कसबा आणि पिंपरी-चिंचवड या पुण्यातील दोन विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा आज निकाल आहे, संपूर्ण राज्याचं लक्ष या निकालाकडे लागले होते. कसब्यातील दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील व्यक्तींना उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त होत असताना भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. तर मविआकडुन रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली असून, आता कसब्यात रवींद्र धंगेकर हे किंगमेकर ठरल्याचं दिसून येत आहे.
बालेकिल्ला असलेल्या कसबा मतदारसंघामध्ये भाजपला पराभवाचा सामना करा लागला आहे. कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. मतमोजणीपासून धंगेकर यांनी तब्बल 6 हजार 700 मतांनी आघाडी घेतली. तर रासने यांना 50490 मतं मिळाली आहे. दरम्यान, अखेर 11 हजार 40 मतांनी मविआचे धंगेकर विजयी झाले आहेत.
दरम्यान, रविद्र धंगेकर यांच्या राजकीय कारकीर्दीवर एक नजर टाकली तर त्यांनी आपल्या जीवनातील बराच काळ हा राज ठाकरे यांच्या मनसेत घावला आहे. यावेळी त्यांनी अनेक महत्वाच्या पदांवर काम केले आहे. मात्र, त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात ही शिवसेनेतून झाली आहे. नंतर त्यांनी पुन्हा एकदा पक्षांतर केलं आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
तब्बल 4 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले रवींद्र धंगेकर नेहमीच चर्चेत असतात. धंगेकर नेहमी दुचाकीवर प्रवास करतात. याचा स्वतः धंगेकर यांनी खुलासा केला होता… “मी चारचाकीवर बसत नाही आणि सिनेमाही बघत नाही. मी आजपर्यंत चित्रपटगृहात गेलेलो नाही. मला लोकांमध्ये राहायला आणि त्यांची सेवा करायला आवडे त्यामुळेच… मी कायम जनतेची सेवा करत राहणार आहे’. असं ते म्हणतात.