पुणे – महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) मोहम्मद शाहनवाज शफी / रहमान आलम या वॉण्टेड दहशतवाद्याचे छायाचित्राचे प्रसिध्द केले आहे. जो सध्या पुण्यात अटक करण्यात आलेल्या दहशतवादी संशयितांच्या गुन्ह्यात फरार आहे. 18 जुलै रोजी पुण्यातील कोथरूड परिसरात या प्रकरणाशी संबंधित आणखी दोन व्यक्तींना अटक करताना आरोपी पळून गेला होता.
एटीएसच्या अधिकाऱ्यांनी कोथरूड येथून मोहम्मद इम्रान मोहम्मद युनूस खान आणि मोहम्मद युनूस मोहम्मद याकूब साकी यांना ताब्यात घेतले होते. हे दोन्ही व्यक्ती राजस्थानमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) ‘मोस्ट वॉन्टेड’ यादीत असल्याचे उघड झाले आहे.
त्यानंतरच्या तपासात असे उघड झाले की अटक करण्यात आलेल्या संशयितांनी बॉम्बस्फोटांचा कट रचला होता आणि पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या जंगलात त्यांनी चाचण्या केल्या होत्या. याशिवाय कोंढवा येथील त्यांच्या निवासस्थानी स्फोटक साहित्याचा साठा सापडला आहे