वृत्तसंस्था – विमान अपघातात लॅटिन ग्रॅमी पुरस्कार विजेत्या 26 वर्षीय गायिकेचा मृत्यू झाल्याची दु:खद बातमी समोर आली आहे मॅरिलिया मेंडोंकाचा असे या गायिकेचे नाव असून या अपघातात तिच्यासह अन्य् चार जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवार रोजी विमान कोसळल्याची घटना मिनास गेराइस येथे घडली होती.
View this post on Instagram
शुक्रवार रोजी मेंडोंकाचा एका म्युझिक कॉन्सर्टसाठी कॅराटिंगा येथे जात होती यादरम्यान मिनास गेराइसमध्ये त्यांचे विमान कोसळले. या विमान अपघातात निर्माते हेन्रिक रिबेरो, सहाय्यक अॅबिसिएली सिल्वेरा डायस फिल्हो यांच्यासह वैमानिक आणि सहवैमानिक यांनीसुद्धा अपघातात प्राण गमावले. दरम्यान, मॅरिलियाने विमानात जाण्यापूर्वीचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. तिचा तो व्हिडिओ शेवटचा ठरला आहे.
मॅरिलिया मेंडोंकाचा या 26 वर्षीय गायिकेने २०१९ मध्ये लॅटिन ग्रॅमी पुरस्कार पटकावला होता. मेंडोंकाच्या एका कॉन्सर्टच्या लाइव्ह ब्रॉडकास्टला ३.३ दशलक्ष कनकरंट व्ह्यूअर्स होते. युट्यूबवरील हा एक जागतिक विक्रम आहे.