रणबीर कपूर आणि आलिया भट्ट या जोडीला पडद्यावर पाहण्यासाठी त्यांच्या चाहत्यांना दीर्घ काळापासून प्रतीक्षा करावी लागू शकते. कारण पुन्हा एकदा त्यांचा चित्रपट पुढे ढकलल्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वीच अयान मुखर्जी यांनी ब्रह्मास्त्र चित्रपट 4 डिसेंबरला प्रदर्शित होणार असल्याचे जाहीर केले होते. परंतु, भारतात करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने चित्रपटाचे शूटिंग थांबविण्यात आले आहे.
रणबीर आणि अयान या दोघांनी प्रथम आपल्या टीमच्या सुरक्षितेला प्राधान्य दिले असून ते कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू इच्छित नाही. यासाठीच चित्रपटाचे शूटिंग पुढे ढकलण्यात आले असून आता एप्रिलमध्ये शूटिंग करण्यात येणार आहे.
यापूर्वी यंदाच्या उन्हाळ्यात चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे बोलले जात होते. पण ब्रह्मास्त्रमध्ये टाकण्यात येणाऱ्या व्हीएफएक्सचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख बदलण्याची शक्यता आहे. यामुळे अयान आणि करण दोघेही खूश नाहीत.
पण अर्ध्या गोष्टी प्रेक्षकांसमोर मांडायच्या नसल्याने आता चित्रपट हिवाळ्यात प्रदर्शित करण्याशिवाय पर्याय नाही.
दरम्यान, ब्रह्मास्त्र चित्रपट गतवर्षी ख्रिसमसला प्रदर्शित होणार होता. परंतु वीएफएक्सचे काम पूर्ण न झाल्याने चित्रपटाची तारीख यंदाच्या उन्हाळ्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. दरम्यान संजू चित्रपटानंतर रणबीरचा एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही.