लंडन – आतापर्यंतच्या इतिहासात विश्वविजेतेपदाने इंग्लंडला तीन वेळा आणि न्यूझीलंडच्या संघाला हुलकावणी दिली आहे. पण, यांदाच्या वर्षी मात्र विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच एक नवा जगज्जेता संघ सर्वांसमोर येणार आहे. तेव्हा गोलंदाजीच्या बळावर इंग्लंडचा संघ विश्वचषकाचा अंतिम सामना गाजवणार की फलंदाजीच्या माऱ्याने किवींचा संघ त्यांच्यावर मात करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर आज विश्वटषक2019चा विजेता ठरणार आहे. दरम्यान, न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यात दोन्ही संघासाठी संघनिवड महत्वाची आहे. त्यादृष्टीने आज दोन्ही संघाने आपल्या संघात कोणताही बदल केलेला नाही. उपांत्य फेरीमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत भारतीय क्रिकेट संघावर मात करणारा न्यूझीलंडचा संघ आणि ऑस्ट्रेलियावर मात करणाऱ्या इंग्लंडचा विजेता संघ कायम ठेवण्यात आला आहे.
न्यूझीलंड संघ – मार्टिन गप्टिल, हेनरी निकोल्स, केन विलियमसन, रॉस टेलर, टॉम लाथम, कॉलिन डी ग्रैंडहोम, जिमी नीशम, मिचेल सैंटनर, मैट हेनरी, लॉकी फर्ग्यूसन, ट्रेंट बोल्ट
इंग्लंड संघ – जेसन रॉय, जॉनी बेयर्सटो, जो रूट, इयोन मॉर्गन, बेन स्टोक्स, जोस बटलर, क्रिस वोक्स, लियाम प्लंकेट, आदिल राशिद, जोफ़्रा आर्चर, मार्क वुड