मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीत सहाव्या जागेवर भाजपाच्या धनंजय महाडिकांचा दणदणीत विजय झाला आहे. सहाव्या जागेसाठी शिवसेनेच्या संजय पवार आणि भाजपाच्या धनंजय महाडिकांमध्ये अटीतटीचा सामना रंगला होता. त्यामध्ये धनंजय महाडिकांनी बाजी मारली. दरम्यान, या विजयानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.
“शिवसेना ही महाविकास आघाडीतील “ढ” टीम आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. बोरू बहाद्दर कारकून आणि “ढ” टीम चे कप्तान तोंडावर आपटले,” असा टोला संदीप देशपांडे यांनी लगावला आहे.
शिवसेना ही महाविकास आघाडीतील “ढ”टीम आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. बोरू बहाद्दर कारकून आणि “ढ” टीम चे कप्तान तोंडावर आपटले.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) June 11, 2022
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे दोन उमेदवार मैदानात होते. त्यामध्ये आता धनंजय महाडिकांनी बाजी मारली आहे. भाजपाने धनंजय महाडिकांच्या रुपाने सहावा उमेदवार रिंगणात उतरवत मोठी खेळी खेळली होती. महाडिक यांच्या विजयानंतर महाविकास आघाडीसह शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, राज्यातील महाविकास आघाडीला या निवडणुकीत मोठा धक्के बसला आहे. भाजपचे तीन उमेदवार या निवडणुकीत विजयी झाले आहेत तर महविकास आघाडीचे प्रत्येकी एक एक उमेदवार निवडून आले आहेत.