लंडन: ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना रविवारी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. करोना विषाणूच्या उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर एका आठवड्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला, असे डाउनिंग स्ट्रीटच्या प्रवक्त्याने सांगितले. करोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर 10 दिवसांनी गेल्या रविवारी जॉन्सन यांना सेंट थॉमस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी वॉर्डमध्ये हलवले जाण्यापूर्वी त्यांना तीन रात्री “आयसीयु’मध्ये ठेवण्यात आले होते. पंतप्रधान त्यांच्या चेकर्स मधील निवासस्थानी विश्रांती घेतील, असे डाऊनिंग स्ट्रीटच्या प्रवक्त्याने सांगितले.
वैद्यकीय तज्ञांच्या सल्ल्यानुसार पंतप्रधान तत्काळ कामावर परत येणार नाहीत. त्यांना मिळालेल्या ट्रीटमेंटबद्दल सेंट थॉमस येथील सर्वांचे आभार मानण्याची त्यांची इच्छा आहे, असेही या प्रवक्त्याने सांगितले.