मुंबई – बॉलिवूडमध्ये ‘फिट गर्ल’ म्हणून ओळखणारी अभिनेत्री म्हणजे ‘शिल्पा शेट्टी’ कुंद्रा. हिचा आज वाढदिवस आहे. शिल्पाच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
8 जून 1975 मध्ये शिल्पाचा जन्म झाला होता. ‘बाजीगर’या चित्रपटातून तिने आपल्या बॉलिवूड करीअरला सुरुवात केली असून, या चित्रपटात अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री काजोल यांनी देखील मुख्य भूमिका साकारल्या होत्या. शिल्पाने या चित्रपटानंतर जवळपास 40 सिनेमे करत, बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले. आज शिल्पा लाखो दिलो की धड़कन बनली आहे.
दरम्यान, शिल्पा नेहमीच तिच्या सोशल मीडियावर तिच्या फिटनेस आणि योगाचे व्हिडिओ शेअर करताना दिसते. त्यामुळे तिच्या फिटनेसबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. स्वत:ला छान ठेवण्यासाठी शिल्पा रोज व्यायाम करते. त्यात कार्डिओ, स्ट्रेन्थ ट्रेनिंग आणि योगही आहे.
पाच दिवस ती जिममध्ये जाते आणि दोन दिवस योगाला देते. योग आणि वर्कआऊटनंतर ती प्रोटिन शेक घेते. शिल्पा खूप फुडी आहे त्यामुळे आठवड्यातून एकदा मात्र ती बाहेरचं खाणं पसंत करते.