बॉलीवूडचा सदाबहार नायक ‘देव आनंद’

मुंबई – बॉलीवूडचा सदाबहार नायक म्हणजेच, ‘देव आनंद’ यांची आज जयंती आहे. देव आनंद यांनी वयाच्या 23 व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होत. पंजाबच्या गुरुदासपूरमध्ये 26 सप्टेंबर 1923 मध्ये त्यांचा जन्म झाला होता. देव आनंद यांचे वडील पिशोरीमल एक ख्यातनम वकील असून कांग्रेस कार्यकर्ता देखील होते.

देव आनंद यांनी 3 डिसेंबर 2011 रोजी लंडनमध्येअखेरचा श्वास घेतला होता. ते हिंदी, इंग्रेजी, संस्कृत, उर्दू, पंजाबी, अरबी, जर्मन, हिब्रू सारख्या भाषा बोलत होते.

देव आनंद यांनी बॉलिवूड मध्ये ‘अँटी हीरो’चा ट्रेण्ड सुरू केला होता. ‘बाजी’ चित्रपटातला मदन आठवा. आजारी बहिणीसाठी अट्टल जुगारी बनलेला देव. ‘हाऊस नंबर 44’ मधला अशोक म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसांचा नायक आणि अट्टल गुन्हेगार. ‘टॅक्सी ड्रायव्हर’ मधला मंगल म्हणजे गुन्हा करण्यासाठी स्वतःची गाडी वापरू देणारा इसम.

असे अनेक अविस्मरणीय पात्र देव आनंद यांनी साकारली. आणि आपल्या उत्तम अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात आपले एक वेगळे घर निर्माण केले. देव आनंद नावाची एक अद्भूत व्यक्तीच असे काहितरी करू शकते. त्यामुळे या सदाबहार अभिनेत्याला विसरणे शक्य नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.