मुंबई – भारतामध्येही दिवसागणिक करोना व्हायरसच्या प्रादुर्भाव वाढत आहे. या भयानक महामारीने देशात नव्हे तर संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. आतापर्यंत अनेक बॉलिवूड कलाकार या विषाणूच्या विळख्यात सापडेल असून, आता सिने अभिनेत्री ‘पूजा हेगडे’ हिला देखील करोनाची बाधा झाली आहे. पूजा हेगडे हिने स्वतः हा सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे.
दरम्यान, यापूर्वी अभिनेता आमिर खान, मिलिंद सोमण, रणबीर कपूर, परेश रावल, कार्तिक आर्यन, अर्जुन रामपाल आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांना करोनाची लागण झाली होती. करोना विषाणूचा हाच वाढता संसर्ग लक्षात घेता अनेक राज्यांत काही दिवसांकरता कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे.