Shubman Gill Health: टीम इंडियाने वनडे वर्ल्ड कप 2023 मधील पहिला सामना जिंकला असेल, पण भारतीय संघाच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीये. भारताची टॉप ऑर्डर महत्त्वाच्या प्रसंगी अपयशी ठरत आहे आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातही असेच घडले. त्याचवेळी संघाचा स्टार सलामीवीर शुभमन गिल हा सामना खेळण्यासाठी अद्याप तंदुरुस्त नाही.
Shubman Gill’s platelet count dropped a bit so he has been hospitalized at a facility called Cauvery in Chennai as a precautionary measure. With 4 days left for Pakistan game, it would be surprising if he gets fit and regains strength to play that game.#IndianCricketTeam
— Kushan Sarkar (@kushansarkar) October 10, 2023
शुभमन गिल डेंग्यू पॉसिटीव्ह असून त्याच्या रक्तात प्लेटलेटचे प्रमाण कमी होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, शुभमन गिलला चेन्नईतील कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशात शुभमन गिल पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही खेळण्याची शक्यता फारच कमी आहे.
वर्ल्ड कप 2023 सुरू होण्यापूर्वीच शुभमन गिलला डेंग्यूची लागण झाली होती. तेव्हापासून तो टीम इंडियापासून दूर आहे. तो चेन्नईत ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा पहिला सामना खेळला नाही. तसेच तो अफगाणिस्तानविरुद्ध खेळणार नसल्याचेही ठरले होते. आणि आता रुग्णालयात दाखल केल्यानंतर तो १४ ऑक्टोबरला अहमदाबादमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळण्याची शक्यता कमी आहे.
शुभमन गिलच्या प्लेटलेट्स कमी झाल्यामुळे त्याला चेन्नईतील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. तेव्हापासून त्याच्या पाकिस्तानविरुद्ध खेळण्यावर सस्पेन्सची टांगती तलवार आहे. कारण सध्याची परिस्थिती पाहता तोपर्यंत गिल फिट होतील असे वाटत नाही.