मुंबई – अभिनेत्री शहनाज गिलला बिग बॉस 13 च्या सीझनमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली. आपल्या वेगळ्या शैलीसाठी ती ओळखली जाते. याशिवाय ती तिच्या सौंदर्याने चाहत्यांची मनेही लुटते. बिग बॉसमधून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या शहनाज गिलने बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण केले आहे. सध्या शहनाज सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. अनेक सुंदर व्हिडिओ आणि फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच तिने तिचा एक सुंदर व्हिडिओ इनस्टाग्रामवर शेअर केला आहे.
इनस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये शहनाज सुंदर लुकमध्ये दिसत आहे. यावेळी शहनाजने हिरव्या रंगाचा शॉर्ट डीपनेक ड्रेस घातला आहे आणि काळा गॉगल देखील घातल्याचे दिसते. या व्हिडीओमध्ये खास पोझ देताना शहनाज गिल दिसते. यातील तिची अदा चाहत्यांच्या देखील चांगलीच पसंतीस पडली आहे. या लुकमध्ये ती खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे.
शहनाज गिलच्या या व्हिडीओवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले की, ‘तु खुपच सुंदर दिसत आहे.’ तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले की, ‘शहनाज तू रॉकस्टार आहेस.’ सध्या तिचा हा लुक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे.
View this post on Instagram
दरम्यान, शहनाज गिल सध्या तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते. अनेकदा ती गाणे गाताना तिचे व्हिडिओ शेअर करत असते. याशिवाय शहनाजने सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे कौतुक देखील करण्यात आले.