बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रिपोर्ट्सनुसार, सैफ अली खानच्या गुडघा आणि खांद्याला फ्रॅक्चर झाले आहे. त्यांच्या गुडघ्याची सर्जरी करण्यात आली आहे. यावेळी त्याच्यासोबत करीना कपूर सुद्धा रुग्णालयात उपस्थित होती. मात्र याबाबत सैफ आणि करीन कपूरने अधिकृतपने माहिती दिलेली नाही.
सैफ लवकरच साऊथ चित्रपट देवरामध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तो बहिराच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात जूनियर एनटीआर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच या चित्रपटात जहान्वी कपूर लीड अभिनेत्रीच्या भीमेकेत दिसणार आहे. रिपोर्ट्सनुसार या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्याला दुखापत झाली असल्याची चर्चा आहे. सैफ यापूर्वी अनेकदा शूटिंग दरम्यान जखमी झाला आहे, २०१६ साली रंगून दरम्यान सैफ जखमी झाला होता. तसेच ‘क्या कहना’ चित्रपटाच्या शूटिंगवेळीही तो गंभीर जखमी झाला होता.