पुणे – मुंबई-पुणे द्रुगती महामार्गावर (यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग) कुसगाव ढेकू गाव आणि ओझर्डे ट्राॅमा केअर सेंटरजवळ गॅन्ट्री उभारण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे मंगळवारी (दि. 12) दुपारी 12 ते 2 या वेळेत पुणे मार्गावरील सर्व वाहतूक वळविण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने केले आहे.
ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत मुंबई व पुणे मार्गावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत गॅन्ट्री उभारण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे वेळोवेळी याठिकाणी ब्लाॅक घेण्यात येत असून, जड वाहतूक थांबवून किंवा पर्यायी मार्गाने वळविण्यात येत आहे. दि. 12 डिसेंबरला याच कामासाठी पुणे मार्गावरील सर्व प्रकारची अवजड वाहतूक तसेच छोटी वाहने (कार) कुसगाव टोलनाक्यावरून जुना मुंबई-पुणे महामार्गाने पुणे दिशेला वळविण्यात येणार असल्याचे महामंडळाने सांगितले.