पिरंगुट – कासारआंबोली (ता. मुळशी) येथील राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेत मुळशी तालुकास्तर शालेय तायक्वांदो स्पर्धा पार पडली. यामध्ये एकूण 10 शाळांमधील एकूण 31 मुले व 55 मुली अशा एकूण 86 खेळाडूंनी भाग घेतला.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे, म. ए. सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा कासारआंबोली व मुळशी तालुका क्रीडा शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मुळशी तालुकास्तर शालेय तायक्वांदो स्पर्धा झाली. यात चौदा, सतरा आणि एकोणीस वयोगटातील मुले मुली सहभागी झाले होते.
या स्पर्धेचे उद्घाटन पोलीस उपनिरीक्षक संतोष भूमकर यांच्या हस्ते झाले. खेळाडूंना शपथ सैनिकी शाळेची सृष्टी वाघमोडे हिने दिली. यावेळी मुळशी तालुका क्रीडा शिक्षक संघाचे उपाध्यक्ष गोरख शहाणे, मुळशी तालुका तायक्वांदो असोशिएशनचे अध्यक्ष गुरुनाथ काळे, तायक्वांदो शिवछत्रपती पुरस्कार विजेती कोमल पठारे, सैनिकी शाळेचे उपमुख्याध्यापक अनंत कुलकर्णी, पर्यवेक्षक श्याम नांगरे, क्रीडा पर्यवेक्षक संदीप पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
या संपूर्ण स्पर्धेचे नियोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे, शाळेचे कमांडंट एअर विंग कमांडर एम. यज्ञरमण (निवृत्त), मुख्याध्यापिका पूजा जोग यांच्या मार्गदर्शनानुसार पर्यवेक्षक संदीप पवार व महादेव मगर यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व संयोजन पर्यवेक्षक संदीप पवार यांनी केले. क्रीडा शिक्षक महादेव मगर यांनी आभार मानले.
खेळाडूंची जिल्हास्तरावर निवड
वयोगट 14 मुले- आरूष सरकटे, रुद्र शेडगे, रूद्रांश इंगवले (श्री श्री रविशंकर स्कूल, भुकूम). वयोगट 14 मुली – स्वरा हरदे, मृणाल कोळवणकर (दोघीही श्री श्री रविशंकर), रितिषा काळकर (संस्कृती स्कूल). वयोगट 17 मुले – सरस शेळके, देवेंद्र रोटी (दोघेही श्री श्री रविशंकर), सत्यम माने (भूगाव हायस्कूल). वयोगट 17 मुली- अनुष्का भालेराव (विद्या भवन स्कूल), तेजस्विनी सोनटक्के, अनुष्का पवार (सैनिकी शाळा). वयोगट 19 मुली- समृद्धी चव्हाण, रोशनी सोलंकी, सृष्टी वाघमोडे (तिघीही म. ए. सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा).