पाथर्डी – भ्रष्टाचारी काँग्रेस पक्षाचा निषेध असो.. खा.धीरज साहू यांचा धिक्कार असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, अशी घोषणाबाजी करत आयकर विभागाच्या छाप्यात २५० कोटी रुपयापेक्षाही जास्त सापडलेला काळा पैसा जप्त करून कायदेशीर कारवाई करावी, यासाठी पाथर्डी तालुका भाजपा महिला आघाडीच्या वतीने शहरातील स्व. वसंतराव नाईक चौकात सकाळी ११ वाजता काँग्रेसचा पुतळा जाळण्यात आला. नायब तहसीलदार भानुदास गुंजाळ यांना निवेदन देण्यात आले.
खा.धीरज साहू यांच्या ओरिसा व झारखंड येथील उद्योगधंद्याच्या व निवासस्थानी आयकर विभागाने घातलेल्या छाप्यात आतापर्यंत सुमारे २५० कोटी रुपयांपेक्षा जास्त काळा पैसा सापडला आाहे. अजूनही काही पिशव्या भरलेली रक्कम मोजणे बाकी आहे. यावेळी भाजपा पदाधिकाऱ्यांनी काॅंग्रेस पक्षाच्या पुतळ्याचे दहन केले यावेळी भ्रष्टाचारी काँग्रेस पक्षाचा निषेध असो.. खा.धीरज साहू यांचा धिक्कार असो, अशी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता. आंदोलनात भाजपा महिला आघाडीच्या पाथर्डी तालुकाध्यक्षा काशिताई गोल्हार, माजी नगरसेविका मंगल कोकाटे, डॉ. शारदा गर्जे, सुरेखा गोरे, सुलभा बोरुडे, रंजना चन्ने, सरस्वती बिडवे, शंकुतला देशमाने, मंदाकिणी कुपाडे, भाजपा तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, माजी जि.प.सदस्य राहुल राजळे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, डॉ.मृत्युंजय गर्जे,
नंदकुमार शेळके, माजी रमेश गोरे, नामदेव लबडे, अनिल बोरुडे, बबन बुचकुल, महेश बोरुडे, बंडू बोरुडे, शहराध्यक्ष अजय भंडारी, बाजार समितीचे संचालक नारायण पालवे, अजय रक्ताटे, बाळासाहेब गोल्हार, जगदीश काळे, बबनराव सबलस, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सचिन वायकर, अक्षय काळे, भगवान साठे, राजेंद्र साप्ते, जमीर आतार, पोपट बडे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थीत होते. पुतळा दहन केल्यानंतर सर्व भाजपा पदाधिकाऱ्यांनी तहसिल कार्यालयात जाऊन नायब तहसीलदार भानुदास गुंजाळ यांना निवेदन दिले.