पुणे – दृष्टीहिनांसाठी देशातील सर्वात मोठ्या बुद्धीबळ स्पर्धांपैकी एक असलेल्या मसावा हर्बल्स एआयसीएफबी राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत कर्नाटकच्या किशन गांगुली याने विजयी सलामी दिली.
स्पर्धेचे उद्घाटन पीवायसी हिंदू जिमखाना येथे महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विकास काकतकर, रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 चे प्रांतपाल पंकज शहा व पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेजचे अध्यक्ष विनायक पेठे, ऑल इंडिया चेस फेडरेशनच फॉर ब्लाइंडचे महासचिव डॉ मनीष थूल, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते बुद्धिबळ प्रशिक्षक रघुनंदन गोखले, सावा हेल्थकेअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश कपूर, शिव छत्रपती पुरस्कार विजेते चंद्रशेखर गोखले, 2 वेळा श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेते जयंत गोखले, पुणे शहरातील सर्वात तरुण ग्रॅंड मास्टर अभिमन्यू पुराणीक आणि रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेजचे केदार गोडबोले आदी उपस्थित होते. रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेजचे अध्यक्ष विनायक पेठे यांनी प्रस्तीविक केले कर अविनाश ओगले यांनी सूत्रसंचालन केले. येत्या 9 तारखे पर्यंत स्पर्धा सुरु असणार आहे.
गेली 6 वर्षे राष्ट्रीय अजिंक्यपद जिंकणाऱ्या किशन गंगोलीला महाराष्ट्राच्या राष्ट्रीय महिला विजेत्या वैशाली सालवकर ला ठरवताना आपले सर्व कसाब पणाला लावावे लागले. वैशालीने अखेर एक चूक केली आणि कर्नाटकच्या आशियाई विजेत्या किशनने बाजी मारली.
महाराष्ट्राच्या आर्यन जोशीने तामिळनाडूच्या रमेशला लंडन पद्धतीने खेळल्या गेलेल्या डावात पराभूत केले. अनुभवी आंतर राष्ट्रीय खेळाडू स्वप्नील शाहने बंगालच्या मेघा चक्रवर्तीने अप्रतिम बचाव करून सामना बरोबरीत सोडवला.