पुणे : असं म्हणतात की राजकारणात कोणी कोणाचा वैरी नसतो आणि कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो. याचीच प्रचिती देणारा एक फोटो पुण्यात सध्या व्हायरल होतोय.
या फोटोत पुण्यात शहर काँग्रेसने घेतलेल्या छत्री दुरुस्ती शिबिरात चक्क भाजपने वाटलेली छत्री दुरुस्तीसाठी आली आहे. त्यामुळे केंद्रात या दोन्ही पक्षात रोज आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असल्याने रोजच राजकारण तापत असले तरी,
पुणेकरांना थंडीचा अनुभव देणाऱ्या या पावसाळ्यात भाजपच्या मदतीला काँग्रेस धावून आल्याची खुमासदार चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.