नवी दिल्ली – भाजप आमदार आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या यांच्या भेटीला पोहोचले आहे. गेल्या अर्ध्या तासांपासून या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा चालू असल्याचे समजते आहे. आशिष शेलार अचानक पवारांना भेटल्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
शरद पवारांच्या दिल्लीतील 6 जनपथ या निवासस्थानी आशिष शेलार दाखल झाले आहेत. अर्ध्या तासापासून चर्चा सुरु असून नेमक्या कोणत्या विषयावर शेलारांनी पवारांची भेट घेतली आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी आज सकाळी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनीही शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतली.