व्हाट्सअपने दिले पुन्हा स्पष्टीकरण म्हणाले,”मित्र किंवा कुटुंबियांसोबतची चॅटिंग गोपनीयच राहणार”

न्यूयॉर्क : इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हाट्सअपने नवीन प्रायव्हसी पॉलिसी आणल्यामुळे जगभरातून त्यांच्यावर टीका होत आहे. त्यातच आता कंपनीने आपल्या नवीन पॉलिसीबाबत पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिलं आहे. प्रायव्हसी पॉलिसीमध्ये बदल झाल्याने मित्र किंवा कुटुंबियांसोबत केलेल्या तुमच्या चॅटिंगच्या गोपनियतेवर कोणताही परिणाम होत नाही, असे स्पष्टीकरण व्हाट्सअपकडून देण्यात आले आहे. नवीन पॉलिसी केवळ बिजनेस युजर्ससाठी आहे असा दावाही कंपनीने केला.

‘तुमचे खासगी मेसेज आधीप्रमाणेच 100 टक्के एंड-टू-एंड एन्क्रिप्शनअंतर्गत सुरक्षित ठेवले जातील. पॉलिसीमध्ये बदल झाल्याने मित्र किंवा कुटुंबियांसोबत केलेल्या तुमच्या चॅटिंगच्या गोपनियतेवर कोणताही परिणाम होणार नाही असे स्पष्टीकरण व्हॉट्सअ‍ॅपने ट्विटरद्वारे दिले आहे. कंपनीने याबाबत दुसऱ्यांदा स्पष्टीकरण दिले आहे. नवीन पॉलिसी केवळ बिजनेस युजर्ससाठी आहे’, असा दावा कंपनीने पहिल्यांदा स्पष्टीकरण देतानाही केला होता.

व्हाट्सअपने दिलेले स्पष्टीकरण…

व्हाट्सअपने ट्वीटसोबतच आपल्या ब्लॉगची एक लिंकही शेअर केली आहे. पॉलिसीमध्ये झालेला बदल केवळ बिजनेस युजर्ससाठी असल्याचे कंपनीने म्हटले आहे. खासगी चॅटिंगवर याचा कोणताही परिणाम होणार नाही. फेसबुक कंपनी व्हॉट्सअ‍ॅप युजर्सची चॅटिंग वाचू शकणार नाही किंवा युजर्सची कॉन्टॅक्ट लिस्टही फेसबुकसोबत शेअऱ केली जाणार नाही, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

* व्हाट्सअप तुमचे खासगी मेसेज वाचत नाही किंवा कॉलही ऐकत नाही. शिवाय फेसबुकलाही याची परवानगी दिलेली नाही.
* व्हाट्सअप तुमचे मेसेज आणि कॉल हिस्ट्री सेव्ह करत नाही.
* व्हाट्सअप तुम्ही शेअर केलेली लोकेशन बघत नाही किंवा फेसबुकसोबतही शेअर करत नाही.
* व्हाट्सअप तुमची कॉन्टॅक्ट लिस्ट फेसबुकसोबत शेअर करत नाही.
* व्हाट्सअप ग्रुप अजूनही पूर्णतः प्रायव्हेट आहेत.
* तुम्ही मेसेज आपोआप डिलिट करण्यासाठी सेट करु शकतात.
* तुम्ही तुमचा व्हाट्सअप डेटा डाउनलोड करु शकतात.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.