Lok sabha Election 2024 – बंगालमध्ये गमावलेल्या लोकसभेच्या २२ जागांवर भाजप विशेष लक्ष देणार आहे. या सर्व जागा तृणमूल काँग्रेसने जिंकल्या होत्या. काही जागांवर भाजप आणि तृणमूल यांच्यात चुरशीची लढत होती. तिथे भाजपचा फार कमी मतांनी पराभव झाला.
केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते अमित शहा यांनी बंगालमध्ये एकूण 35 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले असल्याची माहिती आहे.
यावेळी भाजप बंगालच्या त्या 22 लोकसभा जागांवर विशेष लक्ष देईल, जिथे ते 2019च्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर होते.
गेल्या लोकसभा निवडणुकीत बंगालमध्ये भाजपने 42 पैकी 18 जागा जिंकल्या होत्या, तर 22 जागांवर दुसऱ्या क्रमांकावर होता. या सर्व जागा तृणमूल काँग्रेसने जिंकल्या होत्या. काही जागांवर भाजप आणि तृणमूल यांच्यात निकराची लढत होती.
तेथे भाजपचा फार कमी मतांनी पराभव झाला. यावेळी भाजपने 370 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. जे साध्य करण्यासाठी बंगालमध्ये आघाडी मिळवणे आवश्यक आहे. त्यामुळे 2019 मध्ये गमावलेल्या जागा जिंकण्यासाठी भाजप कोणतीही कसर सोडणार नाही.
35 जागा जिंकण्याचे लक्ष्य
केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते अमित शहा यांनी बंगालमध्ये लोकसभेच्या एकूण 35 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले असल्याची माहिती आहे. भाजपच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पक्ष यावेळी बंगालमध्ये अनेक नवीन चेहऱ्यांना उमेदवारी देऊ शकतो. तृणमूलप्रमाणे बंगाली चित्रपटसृष्टीतील (टॉलिवूड) अनेक कलाकारांना तिकीट दिले जाऊ शकते.
बंगालमध्ये प्रचारासाठी खास रणनीती
२०२१च्या बंगाल विधानसभा निवडणुकीतही भाजपने अनेक टॉलिवूड कलाकारांना उमेदवारी दिली होती. प्रसिद्ध अभिनेते आणि भाजप नेते मिथुन चक्रवर्ती यांनाही उमेदवारी दिली जाईल, अशी अटकळ बांधली जात होती.
मात्र मिथुन यांनी नुकताच याला पूर्णविराम देत निवडणूक लढवणार नसून पक्षाचा प्रचार करणार असल्याचे स्पष्ट केले होते. १ मार्चपासूनच प्रचाराला सुरुवात करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.
बंगालमधील निवडणूक प्रचारासाठी विशेष रणनीती तयार करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. पक्षाच्या स्टार प्रचारकांना येथे अधिक वेळ देण्यास सांगितले जाऊ शकते.