Bjp On Rahul Gandhi : भारतातील सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचे बँक खाते गोठवण्यात आले आहे. आज काँग्रेसकडे आपल्या नेत्यांच्या मदतीसाठी दोन रुपयेही नाहीत. निवडणुकीचे तिकीट काढायलाही पैसे नाहीत. असा हल्लाबोल राहुल गांधींनी भाजपवर केला होता. आता बँक खाती जप्त करण्याच्या काँग्रेसच्या आरोपावर भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जाणीव झालेल्या काँग्रेसने निराशेचे निमित्त काढण्याचा प्रयत्न केला आहे, असे भाजपने म्हटले आहे. भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी गुरुवारी काँग्रेसची टिप्पणी हास्यास्पद असलयाचे म्हटले. नड्डा म्हणाले उपरोधिक टोला लगावत म्हणाले, काँग्रेस पक्ष आपल्या राजवटीत सर्व घोटाळ्यांमधून कमावलेला पैसा निवडणूक प्रचारात वापरू शकतो. | Bjp On Rahul Gandhi
भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर खोटे बोलत असल्याचा आरोप करत सोनिया गांधी यांनाही लक्ष्य केले. या दोघांनीही आपल्या बेजबाबदार वक्तव्याने भारतीय लोकशाहीला जागतिक स्तरावर लाजवले आहे, असे ते म्हणाले. | Bjp On Rahul Gandhi
राहुल गांधींचा मोदी शहांवर आरोप
“आमच्यासाठी निवडणुकीचा प्रचार करणे कठीण झाले आहे. एकप्रकारे ही गुन्हेगारी कारवाई आहे. हे सर्व पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा करत आहेत.” असा आरोपही राहुल गांधी यांनी पक्षाची बँक खाती गोठवल्याबाबत बोलताना लावला. | Bjp On Rahul Gandhi