West Bengal – पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी पक्ष टीएमसी आणि भाजप आमनेसामने आहेत. भाजप कार्यकर्त्याच्या मृत्यूनंतर मोठा गोंधळ उडाला आहे. पश्चिम बंगालमधील बांकुरा जिल्ह्यात बुधवारी एका भाजप कार्यकर्त्याचा झाडाला लटकलेला मृतदेह सापडला. त्यानंतर भाजपने टीएमसीवर आरोप करत सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
मात्र, टीएमसीने भाजपचे आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हणत फेटाळून लावले आहे. तसेच पोलीस तपासाच्या निकालाची वाट पाहण्याची गरज व्यक्त केली आहे. सुभदीप मिश्रा असे मृत भाजप कार्यकर्त्याचे नाव आहे. निधीरपूर गावात मित्रा यांचा मृतदेह झाडाला हात बांधलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलीसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आहे.
पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आम्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असून सर्व पैलू तपासल्यानंतर प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. टीएमसी समर्थकांनी मिश्रा यांची हत्या केल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष सुवेंदू अधिकारी यांनी केला आहे. 2023 च्या पंचायत निवडणुकीत ते निधिरामपूरमधून भाजपचे उमेदवार होते. भ्रष्टाचाराविरुद्ध ते आवाज उठवत होते आणि त्यांची लोकप्रियता वाढत होती. याच कारणांमुळे त्यांना टीएमसीने लक्ष्य केले होते.